MPN मराठी न्यूज
मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत.
(मावळ प्रतिनिधी)
शशिकांत चव्हाण
मा.सवौच् न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाच्या आदेशानुसार ज्या जागेत धार्मिक स्थळे असतील ( उदा.मंदिर , मज्जीद , चर्च , गुरुव्दारा ,इ. ) त्या देवस्थानाच्या जमिनीची मालकी देवाकडेच असते त्या ठिकाणी असणारा पुजारी केवळ व्यवस्थापन पहाण्यासाठी नियुक्त व्यक्ती असतो.ती व्यक्ती त्या मंदिराच्या जमिनीचा मालक होवू शकत नाही. असा महत्त्व पूर्व निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.
या निकालाच्या आधारे ऐतिहासिक बुद्ध विहार ( बुध्दभुमी ) देहुरोड, जि,पुणे.या ठिकाणी असणाऱ्या बुध्द विहाराचे मालक केवळ भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत.
त्यामुळे बोधिसत्व जन जागृती संघाच्यावतीने देहुरोड येथील बुध्द विहाराच्या मालकी जमिनीवर ज्या व्यवस्थापनाचे दोन,नावे आहेत
ती नावे संरक्षण मंञालयाच्या संबधीत खात्याने तातडीने वगळून त्या जागी भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्यात यावे,
याबाबत चे सविस्तर निवेदन मावळ लोकसभा लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंग आप्पा बारणे.यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन पाहता खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या प्रकरणी जातीने व गंभीरपणे लक्ष देवून संरक्षण मंञालयाच्या सबंधीत खात्यांची तातडीने मिटींग घेवून सर्वोच्च न्यायालयाने, दिलेल्या आदेशाच्या निकाला नुसार आपण दिलेल्या निवेदनाची योग्य दखल घेवून ऐतिहासिक बुध्द विहार ( बुध्दभुमी ) या जागेवर तथागत भगवान गौतम् बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्याबाबत योग्य निर्णय घेवू.असे ठोस आश्वासन बोधिसत्व जन जागृती संघाच्या अध्यक्षा मा.सौ,संगिता अशोक वाघमारे , उपाध्यक्ष - मा.परशुराम दोडमणी , सचिव - मा.विजय पवार , कार्याध्यक्ष - मा.श्रीकांतजी चोपडे ,
सहखजिनदार - मा.शशिकांत वि.चव्हाण , युवा नेते गणेश जावळे , युवा नेते उद्योजक - सागर लांगे , तसेच् संघाचे जेष्ठ नेते रविंद्रजी चोपडे , संघाचे आधारस्तंभ - अशोकदादा वाघमारे यांना दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा