रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

आमदार यांनी केली वचनपूर्ती नागरिकांनी मानले आभार

MAVAL TALKS NEWS

वचनपूर्ती सोहळा

 शिंदे वस्ती , ठाकरवाडी, काकडे वस्ती, मल्हार कॉलनी हा भाग पालिकेच्या अथवा ग्रामपंचायतीच्या मध्ये येत नसल्याने हा भाग मागासलेला व कोणाच्याही हद्दीत न येणार            असुन,अजून येथे पिण्याचे पाणी अथवा रस्ता अशी कोणतीच ठोस सुविधा नसल्याने नागरिक हैराण झाले होते.




परंतु आमदार सुनील शेळके यांनी या भागाला एक आशेचा किरण दाखवला व रस्ता गटारे आशा छोट्या मोट्या कामला या भागासाठी त्यांनी 85 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिला आणि हा भाग रहिवासीझोन केला या बद्दल या  भागातील सोमटने गावचे चे माजी उपसरपंच सचिन म्हूऱ्हे, यांनी पाठपुरावा करून ही कामे मंजूर केलीत म्हणून येथील नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांनी दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून आमदारांचा वचनपूर्ती सत्कार सोहळा ठेवला होता आणि यापुढे मला शक्य होईल तेवढा निधी मी देण्याचा प्रयत्न करतो असे सांगीतले आहे. सचिन मुर्हे बोलताना म्हणाले की येथील लोकांच्या घराच्या नोंदी लवकर व्हाव्यात यासाठी आपण हा भाग तळेगावच्या नगरपालिकेत समाविष्ट करावा 


तसेच गणेश शिंदे आभार व्यक्त करताना म्हणाले की आम्ही जेव्हापासून राहतोय तेव्हा पासून हा पहिलाच मोठा निधी आम्हाला भेटलाय इथून पुढे या भागाकडे आपले लक्ष असेच राहावे एवढं बोलू त्यांनी मान्यवरांचे उपस्थितांचे आभार व्यक्त केले 



कार्यक्रमास अध्यक्ष मा. आमदार सुनील शेळके,तसेच माजी सभापती मा.विठ्ठल शिंदे, सचिन मुर्हे, कमलेश मुर्हे, गणेश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते

कान्हे फाटा येथील 'ओव्हर ब्रीज'चे काम लवकरच सुरु होणार

 MAVAL TALKS NEWS


'मावळमधील रेल्वेच्या ओव्हर ब्रीज, अंडरपासच्या कामाला गती द्याकान्हे फाटा येथील 'ओव्हर ब्रीज'चे काम लवकरच सुरु होणार

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली रेल्वेच्या कामांची पाहणी


पिंपरी, 26 ऑगस्ट - रेल्वे विभागामार्फत मावळ लोकसभा मतदारसंघात नागरिकांच्या सोईसाठी सुरु असलेल्या  ओव्हर ब्रीज, अंडरपासच्या कामाला गती द्यावी.  कान्हे फाटा येथील ओव्हर ब्रीजचे काम सुरु करण्यासाठी राज्य सरकारची आवश्यक असलेली 'एनओसी' लवकरच मिळवली जाईल. त्यानंतर त्याही कामाला सुरुवात होईल. देहूरोड येथील अप्रोच रोडच्या कामाची गती वाढवावी. अडीच ते तीन महिन्याच्या आतमध्ये त्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिका-यांना दिल्या. तसेच कामशेत येथील रेल्वे गेट बंद केले जाणार नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी निश्चिंत रहावे, असेही बारणे म्हणाले.  


मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, वडगाव, शेलारवाडी, कान्हे फाटा, कामशेत येथे रेल्वेविभागामार्फत सुरु असलेल्या आणि विविध कारणांमुळे रखडलेल्या  विकास कामांची खासदार बारणे यांनी गुरुवारी (दि.26) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, नागरिक यांच्यासोबत पाहणी केली.  अंडरपास, ओव्हर ब्रीजची कामे येत्या काही दिवसांत मार्गी लागतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी पाहणी दौ-यात व्यक्त केला.  


खासदार बारणे यांच्यासोबत रेल्वे विभाग पुणे परिमंडलाच्या मुख्य प्रबंधक (डीआरएम)  रेणू शर्मा, विभागीय व्यवस्थापक सुनील मिश्रा, गौतम मुसळे, जे.पी.मिश्रा, रेल्वे कमिटीचे सदस्य बशीर सुतार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सुनील हगवणे, रघुवीर शेलार, जिल्हा महिला संघटिका शैला खंडागळे, सुनंदा आवळे, रमेश जाधव, रामभाऊ सांवत, अंकुश देशमुख तालुक्यातील इतर पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगाव येथील पाहणी दरम्यान नगराध्यक्ष मयूर ढोरे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.


खासदार बारणे म्हणाले, ''देहूरोड राष्ट्रीय महामार्ग एनएच 4 येथे चालू असलेल्या रेल्वे मार्गावरचा ओव्हर ब्रीज पूर्ण झाला. 'अप्रोच' रोडचे काम तत्काळ पूर्ण करावे. कामाची गती वाढवावी. अडीच ते तीन महिन्यात पुल वाहतुकीसाठी खुला करावा. कान्हे फाटा येथे ओव्हर ब्रीज होत आहे. माझ्या पाठपुराव्यानुसार रेल्वे विभाग आणि केंद्र सरकारच्या वतीने या कामासाठी निधी ठेवला. त्याचा पूर्ण आराखडाही तयार आहे. निविदा प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काम सुरु करण्यासाठी राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाली नाही. त्यामुळे काम थांबले असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. याबाबत राज्य सरकारकडे तत्काळ पाठपुरावा करुन लवकरच 'एनओसी' मिळविली जाईल. त्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या कान्हे फाटा ओव्हर ब्रीजचे काम मार्गी लागेल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे''.


 ''शेलारवाडी येथील अंडरपासचे काम चालू आहे. काही कारणांमुळे संरक्षण विभागाने ते काम अडविले आहे. तिथे पाणी देखील साचत आहे. त्या कामाचीही खासदार बारणे यांनी पाहणी केली. वडगावमधील केशवनगर येथे सुरु असलेल्या अंडरपासच्या कामाची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. समस्या तत्काळ निकाली काढाव्यात. येत्या तीन ते चार महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे अधिका-यांना दिल्या.


''कामशेत येथील अंडरपास आणि नदीपात्राची लेव्हल समान आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले जात आहे. या समस्येतून कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी तिथे ओव्हर ब्रीज करणे गरजेचे आहे. परंतु, ओव्हर ब्रीज राज्य सरकारच्या माध्यमातूनच करावा लागेल. कारण, रेल्वे विभाग त्याकामासाठी खर्च करु शकत नाही. राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला. तर, ओव्हर ब्रीजचे काम होईल. तोपर्यंत कोणत्याही प्रकारे रेल्वे गेट बंद केले जाणार नाही.  याबाबत जिल्हाधिका-यांसोबत बैठक घेतली जाईल. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी  निश्चिंत रहावे'', असे आश्वासन खासदार बारणे यांनी नागरिकांना दिले.


पुणे परिमंडलाच्या मुख्य प्रबंधक (डीआरएम)  रेणू शर्मा म्हणाल्या, ''या पाहणी दौ-यात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्या तत्काळ निकाली काढल्या जातील. रखडलेल्या कामांबात रेल्वे विभागाकडून तोडगा काढला जाईल. कामांची गती वाढविण्यात येईल. कामे लवकरात-लवकर मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे''.

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

श्री.महेशदादा बेंजामिन यांची ख्रिश्चन समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड जाहीर..

MAVAL TALKS NEWS 


श्री.महेशदादा बेंजामिन यांची ख्रिश्चन समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड जाहीर..











मावळ तालुक्यातील तळेगाव शहराचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री.महेशदादा बेंजामिन यांची ख्रिश्चन समाजाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड प्रदेशाध्यक्ष मा.रेव्ह. संजयजी लोंढे साहेब व प्रदेश कोर कमिटीने चाकण या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बैठकीत जाहीर केली.


 श्री. महेशदादा बेंजामिन हे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असून, त्यांची  नुकतीच शासन नियुक्ती दक्षता कमिटीवर निवड झालेली आहे. आमदार सुनील आण्णा शेळके यांचे ते समर्थक असून सामाजिक कार्यामध्ये यापूर्वी त्यांनी अनेक पदे भूषवलेली आहेत. श्री.महेशदादा बेंजामिन सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून ख्रिश्चन समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश ख्रिस्ती समाजाची महागठण असलेली संघटना *ख्रिस्ती समाज समन्वय समिती* महाराष्ट्र राज्य, यावर काल चाकण या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बैठकीत *प्रदेश उपाध्यक्ष* म्हणून निवड करण्यात आली...

बातम्या आणि जाहिराती संपर्क

9028883534


रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

अखिल भारतीय मानव अधिकार संघटने नियुक्ती प्रदान सोहळा

MAVAL TALKS NEWS

अखिल भारतीय मानव अधिकार संघटने नियुक्ती प्रदान सोहळा 

 

कामशेत : अखिल भारतीय मानव अधिकार संघटनच्या वतीने कुमार क्लब हस्ते कोथरूड येथे नवीन मदाधिकारी नेमणूक व सामाजिक कार्यकत्याचा सन्मान सोहळा दु.१२:३० वा आयोजित केला होता. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष शिवदास महाजन,कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड भूषण पाटील लीगल ऍड वायझर,सत्यशोधक रघुनाथ ढोक,फॉडेशनच्या अध्यक्षा निर्मला कुऱ्हाडे उपस्थित होते.



तर भूषण पाटील यांचे शुभहस्ते अखिल भारतीय मानव अधिकार संघटन महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निर्मला कुऱ्हाडे यांना नेमणुकीचे पत्र देण्यात आले.असून  मावळ तालुका सचिव सचिन नंदू ठाकर,मावळ तालुका अध्यक्ष नारायण सुरेश वावरे,मावळ तालुका युवक अध्यक्ष पदी सुधीर दहिभाते यांची निवड करण्यात आली. असेच सामाजिक कार्या बद्दल सत्यशोधक रघुनाथ ढोक,मुबिना शेख,नागनाथ लष्करी,चंद्रकांत हलगरे,मेहमूदा गोऱ्हे,पत्रकार सुभाष भोते यांचा विशेष सन्मान पत्र अध्यक्ष शिवदास महाजन याचे हस्ते देण्यात आले.या प्रसंगी शिवदास महाजन म्हणाले की आपली संस्था फक्त भारत देशात काम करीत नसून या संस्थेचे कार्य इंग्लंड,पाकिस्तान, जर्मनी,अशा देशात कार्यकरीत आहे.अनेकांना न्याय मिळवून देण्यात कार्य सातत्याने करीत असल्याचे म्हटले.

या कार्यक्रमाचे संयोजक निर्मला कुऱ्हाडे यांचा केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला असून रघुनाथ ढोक यांच्या तर्फे महात्मा फुले चरित्र व थोर ऐतिहासिक थुर महिला पुस्तकांचे वाटप केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रघुनाथ ढोक तर आभार प्रदर्शन नारायण वावरे यांनी मानले.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

खडकाळे ग्रामपंचायतकडून महिला वर्गासाठी विनामूल्य टेलरिंग आणि फॅशन डिझाईन कोर्स सुरू

MAVAL TALKS NEWS 

कला व शिक्षण विकास संस्था व ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे यांचाकोकण संयुक्त उपक्रम खडकाळे ग्रामपंचायतकडून  महिला वर्गासाठी विनामूल्य टेलरिंग आणि फॅशन डिझाईन कोर्स सुरू 


खडकाळे : कोकण कला शिक्षण विकास संस्थ मुंबई आणि ग्रामपंचायत खडकाळे यांच्या वतीने कामशेत गावातील महिला वर्गासाठी विनामूल्य टेलरिंग आणि फॅशन डिझाईन कोर्सची रिंकू सभागृह येथे सुरुवात करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या १४ व १५ व्या वित्त आयोगातील तरतुदीनुसार या कार्यक्रमाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन खडकाळे ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने पस्थित होत्या परेश बरदाडे यांनी मशीचे पूजन केले तर ग्रामविकास अधिकारी काळे यांनी हार अर्पण केला.याप्रसंगी सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना सरपंच रुपेश गायकवाड म्हणाले कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई आणि ग्रुप ग्रामपंचायत काळे यांच्या आदेशानुसार कामशेत गावातील महिला वर्गासाठी विनामूल्य टेलरिंग आणि फॅशन डिझाईन कोर्सची माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे ही खूप मोठी आनंद देणारी गोष्ट आहे.कारण गरीब आणि गरजू महिलांना याचा लाभ होणार आहे प्रशिक्षण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या सर्व नियमांचे पालन करून व्हावे असे मी आवाहन करतो. तर लसीकरण झालेल्यांना प्रथम प्राधान्य असेल यासाठी कोकण संस्थेची निवड करण्यात आली.


 महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमानुसार ही संस्था नोंदणी झालेली आहे.केंद्र शासनाची नीती आयोग तसेच व्होकॅशनल बोर्ड दिल्ली येथील ही संस्था नोंदणीकृत आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोग अनुसार प्रशिक्षण देण्यास सक्षम व नावाजलेली आहे. सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, पालघर,ठाणे या ठिकाणी संस्था प्रशिक्षण देत आहे. तर अनेक सामाजिक कामात अग्रेसर आहे. तसेच संस्थेला ग्रामपंचायत किंवा इतर सरकारी संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव सुद्धा आहे.

 मावळ तालुक्यात संस्थेने कोरोना संकट काळात अनेक गावात आदिवासी व कातकरी बांधवांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली आहे.उपसरपंच व इतर मान्यवर सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी उपसरपंच निलेश दाभाडे, ग्रामविकास अधिकारी विलास काळे,निलेश गायखे,मोनाली गायकवाड, अनिता गायखे,शिल्पा दौंडे,विमल पडळकर,परेश बरदाडे,अंजना मुथा,रोहिणी दौंडे,कविता शिंदे, गणपत शिंदे,दत्तात्रय रावते, कविता काळे,वैशाली इंगवले, दत्तात्रय शिंदे,अभिजीत सिनगारे इत्यादी सदस्य उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू माने यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले.

मावळात दुर्गा वाहिनी व बजरंग दल यांची सैनिकांसाठी रक्षाबंधन

 MAVAL TALKS NEWS 

मावळात दुर्गा वाहिनी व बजरंग दल यांची सैनिकांसाठी रक्षाबंधन

खडकाळे : विश्व हिंदु परिषद बजरंग दल व दुर्गा वाहीनीच्या माध्यमातुन घेतला जातोय अनोखा उपक्रम. श्रवण महिन्यात रक्षाबंधन हा सण देश भर मोठ्या  उत्साहात साजरा केला जातो. हिंदु संस्कृतित बहिण भावाच प्रेम व्यक्त करणारा हा दिवस या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधुन सण साजरा करते. बहिण भावाच नात या सणाला अजुन घट्ट होऊन नात्यात आनंदाच वातावरण निर्माण होत. हा सण घरो घरी साजरा केला जातो. 


परंतु देशाच्या सिमांच रक्षण करणार्या सैनिकांना या सणात सहभागी होता येत नाही.आपल्या गावी जाता येत नाही, बहिणींना भेटता येत नाही. परंतु आपल्या सैनिक भावाला राखी तर बांधलीच पाहिजे, जो भाऊ दिवस रात्र सर्वांच्या रक्षणासाठी सिमेवर उभा आहे त्या भावाला राखी बांधन गरजेच आहे. हा भाव लक्षात घेवुन विश्व हिंदु परिषद दुर्गा वाहिनी च्या माध्यमातुन हजारो राख्या तालुक्यातुन गोळा करुन सिमेवरील जवानांना पाठवल्या जाणार आहेत. या साठीचे नियोजन बजरंग दल करणार आहे. 



या उपक्रमाच्या प्रमुख दुर्गा वाहिनी भिमाशंकर जिल्हा संयोजीका अर्पिता फाकटकर यांनी समाजातील माता भगिनींना या संदर्भात अव्हान केल असुन संकलन केंद्रावर राख्या जमा कराव्यात आणि आपल बहिणीच सैनिक भावासाठीच कर्तव्य पार पाडाव.



मावळ तालुका संयोजीका प्रांजल बोडके यांनी संवाद साधत असताना या उपक्रमाला समाज्यातुन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे असे सांगुन सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान केले. संकलन केंद्र टाकवे, वडगाव, देहु, देहुरोङ, तळेगाव, पवनानगर, लोणावळा, कामशेत, सुदुंबरे अश्या विविध ठिकाणी राख्या संकलन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. या उपक्रमाची संकल्पना संतोष भेगडे ( पाटील) यांनी मांडली. यात बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे,बाळासाहेब खांडभोर,महेंद्र असवले,सुशिल वाडेकर,प्रा.गोपिचंद कचरे, मोरेश्वर पोपळे,प्रशांत ठाकर, गोपि शिंदे,तानाजी असवले, विकि शेटे,ओंकार भेगडे,अमोल पगडे असे अस्यंख्य बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी आहेत.

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अण्णाभाऊ साठे 101जयंती

MAVAL TALKS NEWS


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त निगडी दळवी नगर येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाचे अनावरण माननीय श्री राम यादव अडसूळ पालक महाराष्ट्र राज्य लहुजी क्रांती दल यांच्या हस्ते करण्यात आले 



 हजरत मिरावली दत्तार रहे ट्रस्ट यांच्या वतीने यंदा दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले ट्रस्ट व अध्यक्ष राम यादव यांच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन संतोष अडसूळ 



प्रमुख उपस्थिती युवा नेते नाना शेठ घोलप माननीय नगरसेवक उत्तम केंदळे सचिन भाऊ चिखले घटने ते मनसे चे संजय शेठ व  माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र फसवे शंकर कवडे आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला 


आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव खावटी योजने अंतर्गत शासकीय

 MAVAL TALKS NEWS 

आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव खावटी योजने अंतर्गत शासकीय आश्रम शाळा वडेश्वर यांच्या सर्वे नुसार  अंदर मावळ 

आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव खावटी योजने अंतर्गत शासकीय आश्रम शाळा वडेश्वर यांच्या सर्वे नुसार  अंदर मावळ मधिल गोर गरीब आदिवासी माता भगिनी व बांधवाना वडेश्वर आश्रम शाळा येते  खावटी वाटप करण्यात आली 

शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर 


राष्ट्रवादी संघटक संजय गांधी निराधार योजने अध्यक्ष नारायण ठाकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मा .सरपंच बबनराव हेमाडे सरपंच रवींद्र हेमाडे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप


आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री दहीफळे सर  कूसवली सरपंच बाळासाहेब दाते मा .सरपंच गुलाब गभाले संजय गांधी निराधार योजना सदस्य शंकर आप्पा हेमाडे सदस्य दत्ताभाऊ चिमटे मा .सदस्य किरण हेमाडे 

युवक नेते प्रशांत जांबळे व इत्यादी 

व सर्व लाभार्थी व शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते



बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 
90 28 88 35 34

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

मदत नव्हे कर्तव्य मावळचा महाडला मदतीचा हात

MAVAL TALKS NEWS

मदत नव्हे कर्तव्य हाच दृष्टिकोन

 महाड तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती व त्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरून महाड तालुक्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळेच माणुसकीचा वारसा असणाऱ्या अनेक जण सेवकांनी महाड तालुक्याला मावळ तालुक्यातून मदत पुरवणे सुरू केले आहे त्यातीलच मदत नव्हतं कर्तव्य या कल्पने अंतर्गत मावळ तालुक्यातून

 युवा पर्व फाउंडेशन मावळ व कैलास भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने महाड चिपळूण येथील आकले व कळंब वाडी गावातील पूरग्रस्तांना अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले

 


युवा पर्व फाउंडेशन च्या वतीने मावळ तालुक्यात तसेच तालुका व जिल्ह्याबाहेर देखील नेहमी मदत केली जाते. विविध समाजोपयोगी कार्यक्रम देखील राबवले जातात







बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
9028883534

वडगाव मावळ येथून ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त

MAVAL TALKS NEWS 

पुणे ग्रामीण एलसीबीची कामगिरी.


आज दिनांक ०३ /०८/२०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील पाहिजे/ फरार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, वडगाव मावळ  पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव रेल्वे स्टेशन जवळ तलावालागत असलेल्या मोकळ्या मैदानात  ता.मावळ जि.पुणे येथे संशयास्पद हालचाली वरून  ताब्यात घेतलेला इसम नामे कुणाल बाबाजी हरपुढे वय १८  रा.ढोरेवाडा मोरे चौक ता.वडगाव मावळ जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून  विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले *०१ गावठी पिस्टल  व ०१ जिवंत काडतुस  एकुण किं.रु.५०,१००/- ( पन्नास हजार शंभर रुपये)* चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर पिस्टल कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा   पिस्टल मध्य प्रदेश येथून विकत आणल्याचे सांगत आहे. सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.


सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ.अभिनव देशमुख सो., स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली 

पो.उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे

पो.हवा. प्रकाश वाघमारे , 

पोहवा मुकुंद आयचीत,

पो कॉ. प्राण येवले

पो कॉ बाळासाहेब खडके

पो कॉ.अक्षय जावळे

 यांचे पथकाने केली आहे.

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

देहूरोड येथील ऐतिहासिक बुध्दभूमी चा विकास राज्य शासनाने करावा ही जनतेची मागणी

MAVAL TALKS NEWS


 बोधिसत्व जन जागृत संघ देहुरोड याचे ऐतिहासिक बुध्दभूमी चा विकास राज्य शासनाने करावा यासाठी पावसाळी उग्र आंदोलन

         


 दि.१ आॕगस्ट ( देहुरोड - मावळ )  येथील बोधिसत्व जन जागृत संघ देहुरोड यांच्या वतीने ऐतिहासिक बुध्दभूमी चा विकास राज्य शासनाने करावा ही जनतेची मागणी संघाच्या वतीने शासन दरबारी २ वर्षापासुन संघाने भक्कमपणे मांडली असून ही मागणी राज्य शासनाकडुन मंजूर करुन घेणे करीता मावळ चे आमदार सुनिल शेळके व खासदार श्रीरंग बारणे हे प्रयत्नशिल प्रयत्न करत आहेत.

येथील ऐतिहासिक बुद्ध विहार राज्य शासनाने जलदगतीने सुरु करावे. या करीता संघाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरीता ऐतिहासिक बुद्धभुमी येथे *पावसाळी उग्र आंदोलन* करण्यात आले.

या वेळी पिपल्स रि.पार्टी , मानव अधिकार संघटना , दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना , आर.पी.आय.आंबेडकर गट , वुमन राईट , बहुजन समाज पार्टी , महेद्रा कंपनी कामगार , तसेच् आदी संघटना आणि राष्ट्रीय पक्षाचे  पदाधिकारी / वक्ते यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी संघाच्या अध्यक्ष - संगिता अशोक वाघमारे नानी , उपाध्यक्ष - परशुराम दोडमणी , सचिव - विजय पवार , विश्वस्त - शशिकांत वि.चव्हाण , विश्वस्त - श्रीकांत चोपडे , अशोक कांबळे , प्रकाश कांबळे , शोभा वाघमारे , गणेश जावळे , विनोद जावळे , शंकर तलारी , समाधान सोनवणे , बाबा चव्हाण , सचिन गायकवाड ,

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...