सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज


मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत.



(मावळ प्रतिनिधी)
  शशिकांत चव्हाण
मा.सवौच् न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाच्या आदेशानुसार ज्या जागेत धार्मिक स्थळे असतील ( उदा.मंदिर , मज्जीद , चर्च , गुरुव्दारा ,इ. ) त्या देवस्थानाच्या जमिनीची मालकी देवाकडेच असते त्या ठिकाणी असणारा पुजारी केवळ व्यवस्थापन पहाण्यासाठी नियुक्त व्यक्ती असतो.ती व्यक्ती त्या मंदिराच्या जमिनीचा मालक होवू शकत नाही. असा महत्त्व पूर्व निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.
या निकालाच्या आधारे ऐतिहासिक बुद्ध विहार ( बुध्दभुमी ) देहुरोड, जि,पुणे.या ठिकाणी असणाऱ्या बुध्द विहाराचे मालक केवळ भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत.
त्यामुळे बोधिसत्व जन जागृती संघाच्यावतीने देहुरोड येथील बुध्द विहाराच्या मालकी जमिनीवर ज्या व्यवस्थापनाचे दोन,नावे आहेत




ती नावे संरक्षण मंञालयाच्या संबधीत खात्याने तातडीने वगळून त्या जागी भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्यात यावे,
याबाबत चे सविस्तर निवेदन मावळ लोकसभा लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंग आप्पा बारणे.यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन पाहता खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या प्रकरणी जातीने व गंभीरपणे लक्ष देवून संरक्षण मंञालयाच्या सबंधीत खात्यांची तातडीने मिटींग घेवून सर्वोच्च न्यायालयाने, दिलेल्या आदेशाच्या निकाला नुसार आपण दिलेल्या निवेदनाची योग्य दखल घेवून ऐतिहासिक बुध्द विहार ( बुध्दभुमी ) या जागेवर तथागत भगवान गौतम् बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्याबाबत योग्य निर्णय घेवू.असे ठोस आश्वासन बोधिसत्व जन जागृती संघाच्या अध्यक्षा मा.सौ,संगिता अशोक वाघमारे , उपाध्यक्ष - मा.परशुराम दोडमणी , सचिव - मा.विजय पवार , कार्याध्यक्ष - मा.श्रीकांतजी चोपडे , 
सहखजिनदार - मा.शशिकांत वि.चव्हाण , युवा नेते गणेश जावळे , युवा नेते उद्योजक - सागर लांगे ,  तसेच् संघाचे जेष्ठ नेते रविंद्रजी चोपडे  , संघाचे आधारस्तंभ - अशोकदादा वाघमारे यांना दिले आहे.



VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे -शरद पवार

MPN मराठी न्यूज


देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे -शरद पवार


राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या धाडी आणि छापेमारीच्या सत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजितदादा पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवारसाहेब यांनी केलाय.


महाराष्ट्रातील लोकांची सुख दु:ख समजून घ्यावं हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जात आहे. राज्यात जिथं जाणं शक्य आहे, तिथे जाण्याचा प्रयत्न करणार. एक बातमी पक्की असते की पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किमती किती वाढल्या. आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडेल ही बातमीही असतेच. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा आजचे सत्तेतील लोक आंदोलन करत लोकसभेचं सभागृह बंद पाडत होते. पी. चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितलं की 25 टक्के कर जरी केंद्र सरकारनं कमी केला तरी किंमत कमी होईल. पण केंद्र सरकार ते करताना दिसत नाही, असंही पवारसाहेब यावेळी म्हणाले





VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

MPN मराठी न्यूज

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ



श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि.
सन २०२०-२१ च्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री.दिलीपराव वळसे-पाटील साहेब व मा.खासदार श्री.गिरिषजी बापट साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.नानासाहेब नवले, खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे, मा.आमदार श्री.कृष्णराव भेगडे, मा.मंत्री श्री.मदनशेठ बाफना, मा.मंत्री श्री. बाळा भेगडे, मा.आमदार श्री.दिगंबरदादा भेगडे, मा.आमदार श्री.ज्ञानेश्वरजी लांडगे, मा.आमदार श्री.शरद ढमाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष रमेशआप्पा थोरात, मा.जि.प.अध्यक्षा सविताताई दगडे, जेष्ठ नेते संचालक श्री.माऊलीभाऊ दाभाडे, श्री.बाबुराव वायकर, श्री.एकनाथराव टिळे, श्री.ज्ञानेश्वरजी दळवी तसेच सर्व संचालक, पदाधिकारी, सभासद, अधिकारी, शेतकरी बंधु, कामगार वर्ग उपस्थित होते.
आपला,
- बापू जयवंतराव भेगडे (उपाध्यक्ष, श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना)




VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

शासन आपल्या दारी योजना अंतर्गत अनेकांनी घेतला भाग

MPN मराठी न्यूज

शासन आपल्या दारी योजना अंतर्गत अनेकांनी घेतला भाग 



अंदर मावळ च्या पंछीम पट्टा मधिल सुमारे 25 गावांमधील नागरिकांस साठी मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सहकार्य ने व 
शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांच्या विशेष प्रयत्नातून 
 घेण्यात आला 
दिनांक १२व १३व १४रोजी शासकीय आश्रम शाळा वडेश्वर येते हें आभियान राबीवन्यात आले 
यात तीन दीवस सुमारे 2हजार नागरिक बंधु भगिनींनीं भाग घेतला त्यात 


कोळी महादेव आदिवासी समाजाचे सुमारे ३००च्या वर दाखले अर्ज जात प्रमाणपत्र साठी करण्यात आले तर 28 जणांना जात प्रमाणपत्र देण्यात आले शकडॊ जणांनी आधारकार्ड दुरुस्त किंवा नव्याने काढण्यात आले तर रेशन कार्ड (शिधा पत्रिका )नाव कमी करणे किंवा लावणे किंवा खराब कार्ड नवीन घेणे किंवा नव्याने रेशन कार्ड मिळावे या साठी सुमारे 200 जणांनी अर्ज व लाभ घेतला तर  अल्प उत्पन्न दाखले हें सुमारे 150च्या वर या आभीयानात देण्यात आले 
या वेळी सर्व शासकीय खाते प्रमूख व इतर मान्यवर व लाभार्थी यांना फेटे बांधल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आनंद चे वातवरण होते 
महिला बाल कल्याण मावळ च्या मार्फत पोषण आहार गुडी व आहार प्रात्यक्षिक प्रदर्शन भरवण्यात आले होते या वेळेस अनेक नागरिकांनी विविध खाते निहाय माहिती व अर्ज भरले 
या वेळेस तहसीलदार मधुसूदन बर्ग यांनी भेट देऊन शासन आपल्या दारी योजना चि प्रत्यक्ष येऊण पाहणी केली तर आभियान अंतर्गत नायब तहसीलदार  राव साहेब चाटे
गटविकास आधीकारी सुधीर भागवत महिला बाल कल्याण आधीकारी विशाल कोतागडे 
क्रुषि आधीकारी दत्ता पडवळ 
टाकवे बीट आरोग्य आधीकारी श्री डॊ साठे व  युवक नेते देवाभाऊ गायकवाड संजय गांधी योजना अध्यक्ष नारायण ठाकर राष्ट्रीय सेवा योजना चे निखिल सुरवडे व त्यांचे सर्व सहकारी  राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड मा सरपंच शांताराम लष्करी मा सदस्य शंकर हेमाडे मा .सदस्य चेअरमन छगन लष्करी मा .उपसरपंच संजय गराडे युवक नेते रवींद्र हेमाडे युवक नेते दादाभाऊ शिंदे शासकीय कर्मचारी पांडुरंग मोरमारे  कशाळ चे सरपंच मारुती खामकर खांडी चे सरपंच अनंत पावशे कूसवली च्या सरपंच 
सौ चंद्रभागा दाते मा .सरपंच गजानन खरमारे व आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री दहीफळे सर व महिला बालकल्याण पर्यवेक्षक श्रीमती सुलेखा शेख सौ प्रियंका जोग केंद्रे प्रमूख श्री भांगरे व श्री माकर व वडेश्वर जि .प .चे मुख्याध्यापक  श्री मोरमारे सर सहित  इतर सर्व शिक्षक इत्यादी उपस्थित होते 
शासन आपल्या दारी योजना यशस्वी करण्यासाठी मा सदस्य शंकर हेमाडे सरपंच सौ छायाताई हेमाडे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप व सदस्य दत्ताभाऊ चिमटे व शिवराम शिंदे वसुदेव लष्करी सदस्या कू .रुपाली सुपे सौ सुरेखाताई शिंदे सौ हेमांगीताई खांडभोर सौ कुंदाताई मोरमारे व ग्रामसेवक सचिन कासार व शाखा प्रमूख दिलिपदादा खांडभोर हेमंत धोंडगे उल्हास करवंदे(जेवण व्यवस्था ) वायरमन गुलाब करवंदे   सर्व कर्मचारि व शासकीय आश्रम शाळा चे सर्व शिक्षक व कर्मचारी व सर्व जि .प .मुख्याध्यापक व शिक्षक व आंगणवाडी च्या सर्व सेविका व मदतनीस व आशाताई वर्कर यांच़ विशेष सहकार्य ने संपन्न झाले



VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

स्वच्छ समाजकारण व स्वच्छ मावळ या उद्देशाने स्वयंभू फाउंडेशनचा कशाला येथे टीशर्ट व डजबिन वाटप

MPN मराठी न्यूज

स्वच्छ समाजकारण व स्वच्छ मावळ या उद्देशाने स्वयंभू फाउंडेशनचा कशाळ येथे टीशर्ट व डजबिन वाटप




लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त व नवरात्र उत्सवा निमित्त स्वयंभू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष  मा.सरपंच श्री दत्तात्रय आण्णा पडवळ यांच्या वतीने कशाळ येथे टी-शर्ट  व स्वच्छतेसाठी डजबीन वाटप करण्यात आले.यावेळी आण्णांनी भाषण केले व आपल्या भाषणात म्हणाले की आपलं गाव स्वच्छ तर आपला देश  स्वच्छ होईल या हेतुने  डजबीन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.  आपल्या आजुबाजुला कचरा न टाकता तो कचरा टजबिनमध्ये टाकुन  जेणे करुन कचर्‍याची विल्हेवाट योग्य होईल व आपल्या आवती भोवतीच्या निसर्गाचा र्‍हास होणार नाही.असे आव्हान दत्ता पडवळ यांनी केले
 
.मा.सरपंच विठ्ठल जाधव यांनी या कार्यक्रमा निमित्त दत्तात्रय पडवळ यांचे कौतुक केले आण्णांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याउपक्रमातुन संपूर्ण मावळ तालुका कचरा मुक्त होईल व त्यानिमित्त मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या निक्कीच शुभेच्छा मिळतील अशी भावना व्यक्त केली.
 
यावेळी मा.सरपंच विट्ठल जाधव,आदर्श सरपंच शरद जाधव,मा.उपसरपंच तुकाराम जाधव,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नवनाथ जाधव,अध्यक्ष श्री मळुबाई प्रतिष्ठान प्रशांत जाधव, उपाध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष नरेश जाधव, विध्यमान शालेय व्यवस्थान समिती उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव,मा.सरपंच भाऊ गवारी,मा,उपसरपंच योगेश मदगे,उपाध्यक्ष रा.कॉं.सोशल.मिडिया मंगेश जाधव,मा.अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रामदास जाधव,सरचिटनीस रा.कॉं.सोशल मिडीया शंकर मोढवे,आंदर मावळ अध्यक्ष वैभव पिंगळे, दिपक मदगे,शालेय व्यवस्थान समिती सदस्य काळुराम जाधव,भाऊ सुतार,शाम पवार सोन्या पवार, पंकज पडवळ,अक्षय अड़ीवळे,आकाश जांभुळकर,सुग्रीव चव्हाण,श्री मळुबाई प्रतिष्ठान खजिंनदार राहुल जाधव,सुरेश जगताप,किरण जाधव,रूपेश जाधव,तानाजी शिंदे,ऋषिकेश जाधव,गणेश जाधव,चेतन जाधव,विनोद जाधव,बाळासाहेब जगताप,बाळासाहेब जाधव,नितिन जगताप, मारुती जाधव,विष्णु जाधव,दासु शिंदे,गबळु जाधव,गोमाजी जगताप, नितिन जाधव,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.उपसरपंच तुकाराम जाधव व मा.सरपंच विट्ठल जाधव याने केले कार्यक्रमाचे आभार प्रशांत जाधव यांनी मानले, व *श्री मळुबाई प्रतिष्ठानचे युवक,महिला, पधाधिकारी,व स्वयंभु फाउंडेशनचे सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.




VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

टेक्ससास गायकवाड यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी

 MPN मराठी न्युज

 टेक्ससास गायकवाड यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी




विषय - ऐतिहासिक बुध्द विहार ( बुध्दभुमी ) देहुरोड , पुणे.या बुध्द विहाराच्या विकासा करीता वादग्रस्त ठारणारे नाटककार टेक्सास गायकवाड यांच्यावर मोक्का अंतर्गत पोलिस कारवाई करा..बोधिसत्व जनजाग्रुती संघाची सहाय्यक पोलिस आयुक्त मा.संजय नाईक पाटील यांच्याकडे मागणी , 
महोदय ,
ऐतिहासिक बुध्द विहार याचा विकास गेली ६५,वर्षापासून दोन वादग्रस्त संस्थेमुळे रखडला असून या दोन्ही वादग्रस्त संस्था या पवित्र बुध्द विहाराचा विकास करु शकत नाही. या मागे या संस्थेचा स्वार्थ असून फार मोठे षडषयंत्र त्या मागे आहे त्या एका संस्थेचा प्रमुख नाटककार, टेक्सास गायकवाड हा एकमेव  विकास करीता वारंवार वादग्रस्त ठरत आहे.त्यामुळे सर्व धर्मीय जनतेच्या मागणी नुसार व सर्व स्थानिक राष्ट्रीय पक्षाच्या पाठींब्याने या बुध्द विहाराचा विकास महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलद गतीने करण्यात यावा अशी मागणी गेली दोन वर्षापासून कार्यक्षम आमदार मा.सुनिलआण्णा शेळके ( आमदार. मावळ )व मा.श्रीरंगआप्पा बारणे ( खासदार, मावळ) यांच्या प्रयत्नाने बोधिसत्व जनजाग्रुती संघाच्या वतीने महाराष्ट्र शासन दरबारी संघाच्या कार्यक्षम पदाधिकारी यांनी शासन दरबारी निवेदनाद्वारे. मांडली आहे. या जनतेच्या मागणीस राज्य शासनाकडून गती मिळाली असता,जर महाराष्ट्र शासनाने या बुध्द विहाराचा विकास केल्यास महाराष्ट्र शासनाच्या सबंधीत खात्यावर,तसेच आमदार. मा.सुनिल आण्णा शेळके.तसेच् खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे. व बोधिसत्व जनजाग्रुती संघाच्या पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करु व यांच्यावर ट्रेस पासींग अंतर्गत अॕट्राँसिटी चा गुन्हा दाखल करु,अशी लेखी धमकी नाटकार,टेक्सास गायकवाड व त्याच्या बेकायदेशीर असलेल्या कलाकारंनी संघाच्या पदाधिका यांना दिली आहे. ऐतिहासिक बुध्द विहार ( बुध्दभुमी )च्या विकासा कामी प्रयत्नशिल असणारे मा.खासदार , मा.आमदार तसेच् ५०००, नागरिकांचा त्यांनी पत्राद्वारे घोर अपमान केला असून त्यांच्या मनोभावना दुःखवण्याचे काम या वादग्रस्त नाटककार टेक्सास गायकवाड,व त्याच्या कलाकार मंडळीने केले आहे.त्यामुळे बोधिसत्व जन जाग्रुती संघाच्या निस्वार्थ कार्यक्षम अध्यक्षा - सौ.संगिता अशोक वाघमारे , मा.पराशुराम दोंडमणी ( उपाध्यक्ष.) मा.विजय पवार ( सचिव. ) मा.श्रीकांतजी चोपडे ( कार्याध्यक्ष. ) मा.गणेश जावळे ( विश्वस्त.) मा.शशिकांत वि.चव्हाण ( सह-खजिनदार.) तसेच् जेष्ठ नेते रविंद्रजी चोपडे यांनी, ऐतिहासिक बुध्द विहाराच्या ( बुध्दभुमी ) च्या विकासा कामी सतत वादग्रस्त ठरणारे एकमेव नाटककार, टेक्सास गायकवाड, यांच्या विरोधात सन १९९१ ते २०२१ पर्यंत यांच्या विरोधात दाखल, झालेल्या पोलिस तक्रारी यांची संपूर्ण माहिती घेवून तसेच् वादग्रस्त धमकीच्या पञाची दखल घेउन, तातडीने नाटककार, टेक्सास गायकवाड यांच्यावर मोक्का अंतर्गत किंवा तडीपार अंतर्गत पोलिस कारवाई करावी. व त्याच्या सोबत असणारे बेकायदेशीर पदाधिकारी कलाकार, यांच्यावर योग्य ती पोलिस कारवाई करावी.अशी मागणी केली आहे.जर नाटककार टेक्सास गायकवाड व त्यांच्या बेकायदेशीर पदाधिकारी कलाकारांन वर लवकरात लवकर पोलिस कारवाई करावी.  अन्यथा बोधिसत्व जनजाग्रुती संघाच्या वतीने,उग्र स्वरुपाचे तिव्र महा आंदोलन ऊभे करु असा ईशारा संघाच्या वतीने देण्यात आला आहे...


आपल्या यूट्यूब चैनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा

VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

मुंबई-पुणे EXPRESS WAY ला टेम्पोला आग तर एकाचा होरपळून मृत्यू



MPN मराठी न्युज 

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर टेम्पोला आग एकाचा होरपळून मृत्यू 


मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर किलोमीटर 18.900 वर गाडीला भीषण आग लागली.  या अपघातात जळलेली गाडी साधारण 12 वाजताच्या दरम्यान 18.900 किलोमीटरला पुणे लेनवर शोल्डरला उभी होती. नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या आय आर बी च्या टीमने तेथे उतरून पाहणी केली. त्यावेळीं गाडीत कोणी आढळले नाही. त्यांनी सेफ्टी कोन लावले, गाडीची नोंद घेतली आणि ते पूढे निघून गेले.  मात्र काही वेळानंतर त्याच गाडीला आग लागल्याचे समजले. लागलीच फायर ब्रिगेड खोपोलीची टीम घटनास्थळी दाखल झाली, देवदूत यंत्रणे सोबत सिडको, रिलायन्स आणि आय आर बी च्या फायर ब्रिगेडने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात विविध पप्रकारच्या वस्तू, सौदर्य प्रसाधने, अगरबत्ती, वायर, इलेक्ट्रिकल साहित्य खच्चुन भरले होते.   बऱ्याच प्रयत्नांती आग नियंत्रणात आलेली असताना केबिन मधे एक मृतदेह पुर्ण जळलेल्या स्थितीत दिसून आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, गुरूनाथ साठेलकर, अमित गुजरे, यासिन शेख यांनी यात मदत केली. मृतदेह बाहेर काढून चौक रुग्णालयात शविच्छेदनासाठी ठेवण्यात आला.

पळस्पे वाहतूक पोलीस, रसायनी बनपोलीस स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्सचे कर्मचारी यांनी मदतकार्यात भाग घेतला.

गाडीच्या नंबर वरुन मिळालेल्या डीटेल्स नुसार केलेल्या फोन वरुन प्रतिउत्तर न मिळाल्याने मृताची काहीही माहिती मिळाली नाही.

काही वेळासाठी पुणे कडे जाणारी वाहतूक बाधीत झाली होती.



अधिक बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व सबस्क्राईब करा.

VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...