सोमवार, २६ जुलै, २०२१

दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गरजूना छञी वाटप

MAVAL TALKS NEWS 

 दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गरजूना छञी वाटप आदी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला






दि. २६ जुलै ( मावळ - तालुका)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) राष्ट्रीय अध्यक्ष  तसेच दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना संस्थापक अध्यक्ष आदरणिय दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुका अध्यक्ष मा.दत्ताशेठ यादव यांच्या नेतृत्वाने तालुक्यातील गोरगरिबांना तब्बल २०० छत्री तसेच कोरोना किट वाटप करण्यात आले. आज तालुक्यात कामशेत या ठिकाणी संपन्न झाला. तसेच आज मावळ तालुका अध्यक्ष मा.दत्ताशेठ यादव यांनी कामशेत येथील आपली अर्धा एकर जमीन (२०गुंठे जमीन )धम्म कार्यास दान म्हणून रिपब्लिकन पार्टी इंडिया (यांस धम्म दान म्हणून दिली आहे. त्या जागी आज धम्म दान स्वरूपात पंचशील ध्वज पुणे जिल्हाध्यक्ष मा. अमितभाऊ वर्मा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. लवकरच याठिकाणी विपश्याना केंद्र, बौद्ध विहार तसेच भन्तेसाठी राहण्याची सोय करण्यात येणार आहे.तसेच यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष डी बी एन मा. संदीपदादा गायकवाड, पुणे जिल्हा सचिव प्रकाश नाडगेरी, रामभाऊ उप्पर डी बी एन, मावळ तालुका डी बी एन अध्यक्ष - मा.तेजसभाऊ निकाळजे, उपाध्यक्ष - कुमारदादा वि.चव्हाण ,  मा. ता. महिलाध्यक्षा मा.कविताताई पारखी,मा. ता. रि. पा. ई कार्याध्यक्ष मा. सुनील सोनावणे, मा. ता. उपाध्यक्ष मा. संजयभाऊ गायकवाड, मा. ता. सरचिटणीस मा. गुलाब आगे, मा. ता. महासचिव मा अमित जुगदार, मा.शशिकांत चव्हाण, मा ता. सचिव संदीप कांबळे, ना. मा. अध्यक्ष राहुल वंजारी, प. मा. अध्यक्ष मा किरण गायकवड, आ. मा. उपाध्यक्ष नंदू सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते राजाराम पारखी तसेंच आदी कार्यकर्ते उपस्थित होते








बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
9028883534

आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा निमित्ताने वर्षावास कार्यक्रम संपन्न

 MAVAL TALKS NEWS 


दि. २६ जुलै ( कामशेत - मावळ ) जगताचे गुरू भगवान बुद्ध हेच होय  बौद्धचार्य अमर चौरे यांचे मत 



The buddist society of india 

भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका व माय रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा वर्षावास सुरुवात धम्मप्रवचन बुद्धवंदना धम्मसंगती मंगलमैत्री धम्मगीते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन  इ कार्यक्रम  रविवार दिनांक 25 जुले 2021 ला दुपारी 12 वाजता खामशेत बुद्धविहार येथे संपन्न झाला कार्यक्रम अध्यक्ष स्थानी 


 आयु अमर चौरे बौद्धचार्य कोरोना युद्धा पुरस्काराने गौरविण्यात आलले  कोरोना काळातील 205 वा मंगल परिणय लग्न विवाह लावलेले असे   केंद्रीय शिक्षक विपश्यना साधक  अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका  निमंत्रक पुणे जिल्हा व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माय रमाई फाउंडेशन रमाई वधू वर सुचक केंद्र हे होते 

     कार्यक्रमाचे उद्घाटक 

 माननीय ज्योतीताई शिंदे 

(सभापती पंचायत समिती मावळ)

माननीय रुपेश (सोनू) गायकवाड

( विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कामशेत शहर )

माननीय दिपकराव गायकवाड (गायक कवी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले अध्यक्ष मावळ कला विकास संघ मावळ ) यांच्या हस्ते करण्यात आले

  माननीय सुरेखा नाईकनवरे पुणे जिल्हा अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन यांचे धम्म प्रवचन झाले 

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन  हर्षदा घायतडके मुदिता रणदिवे अर्पिता रणदिवे अश्विनी खरात कृष्णा ताई व काजल कोळी यांनी केले 

 धम्मगीते अनिल जोगदंड गायक शिंदे किशोर  यांनी गायली 

बुद्धपुजा ऋषिकेश सोनवणे मयूर रणदिवे बुद्धभूषण रणदिवे स्वयंम अमर चौरे  इ घेतली 

       प्रमुख उपस्थिती 

 माननीय मंगल चौरे उपाध्यक्ष महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्ष सी आर पुणे जिल्हा अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन मावळ 

कविता पारखी  अध्यक्ष हवेली तालुका 

 माननीय शैलेंद्र रोकडे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड  शहर 

राजाराम पारखी उपाध्यक्ष  सी आर गृप 

 माननीय उत्तम गायकवाड अध्यक्ष पवन मावळ

जगदीश पगारे संघटक युवक मावळ  

माननीय आरती नाईकनवरे संपर्क प्रमुख मावळ इ उपस्थित होते 

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाघू रणदिवे विजय रणदिवे शशिकांत रणदिवे संजय रणदिवे सचिन खरात अनिल रणदिवे  मिथुन खरात अजय रणदिवे राहुल रणदिवे  नचिकेत खरात  महिला आघाडी प्रीती रणदिवे गौतमी घायतडके आम्रपाली खरात माया खरात सुशीला रणदिवे वंदना रणदिवे स्वेता रणदिवे अंजना रणदिवे रंजना रणदिवे  इ परिश्रम घेतले 

सर्व सम्राट अशोक मिञ मंडळ खामशेत सर्व महिला आघाडी खामशेत नियोजन केले

मावळ च्या सभापती पंचायत समिती ज्योती ताई नितीन शिंदे  यांना भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका व संस्थापक अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अमर चौरे यांच्या वतीने रमाई लेक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले  

अध्यक्षस्थानी अमर चौरे म्हणाले की जगताचे गुरू भगवान बुद्ध च होय अडीज हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्ध यांनी पंच वर्गीय भिक्षूंना धम्म सांगितला  त्यांनी तो जगभर धम्म प्रसार प्रचार केला तो जगभर पसरला त्यामुळे  भगवान बुद्ध यांना जगताचे गुरू मानतात तेंव्हा पासून गुरुपौर्णिमा सुरू झाली...




रविवार, २५ जुलै, २०२१

*मदतीचा हात कोकणवासीयाना साथ*

 MAVAL TALKS NEWS 

तळेगावकरांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोकणात मुसळधार पावसामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी हे गावे, वस्त्यांमध्ये आणि तसेच  शहरी भागात शिरले असल्यामुळे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे.  योग्य ठिकाणी  मदत पोहोचावी  म्हणून आपण 72 तासाची प्रतीक्षा पूर्ण केलीये. आता कोकणातील नागरीकांना तात्काळ मदत करण्याची विनंती की दिनांक २५ जुलै रोजी दुपारी 3 वाजे पर्यंत जनसेवा थाळी मराठा क्रांती चौक तळेगाव स्टेशन येथे तळेगावकर नागरिकांनी विनंती करण्यात आली होती... या दरम्यान नागरिकांनी



कपडे, चादरी, खाण्याचे पॅकिंग पदार्थ, टूथ पेस्ट, पिण्याचे पाणी ,

बेडशीट , चादरी, सतरंजी , ताडपञी

 इतर आदी स्वरूपात मदत केली



तळेगावकर नेहमीच प्रत्येक मदत कार्यात आग्रस्थानी असतात... कोल्हापूर पुरात तळेगावकर  नागरिकांनी केलेली मदत कधीही न विसरण्या सारखी गोष्ट आहे...आपल्या गावाची हि मदतीची  परंपरा आपण अशीच जपुयात...

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष - किशोरजी आवारे वरील उपक्रम राबण्यात आला होता...




धबधब्याच्या पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

MAVAL TALKS NEWS 

मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे धबधब्याच्या ओढयात बुडून दोन लहान मुंलासह  वडिलांचा बुडून मृत्यू झाल्या ची दुर्देवी घटना घडली आहे 



यात पिराजी गणपती सुळे वय  ४० साईनाथ पिराजी सुळे वय १४ सचिन पिराजी सुळे वय ११सर्व राहणार इंद्रायणी काॅलनी  कामशेत, मुळगाव नायगाव वाडी  जि.नांदेड , अशी मृत्यू पावलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत.


V01

मिळालेल्या माहितीनुसार,सकाळर अकरा  वाजण्याच्या सुमारास पिराजी सुळे यांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी दोन्ही लहान मुलांना सोबत घेत कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेला होता. धबधब्याच्या पायथ्याशी पाण्याच्या प्रवाहा ने ओढे तयार झाले आहेत या ओढ्यात लहान मुले खेळत असताना चिखल तसेच माती च्या गाळामध्ये बूडू लागली त्यांचा आवाज ऐकून पिराजी याने सुद्धा पाण्यात उडी मारली परंतु खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पीराजीचा ही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला जवळच एक गुराखी आपली जनावरं चरवत  होता त्याने आरडाओरडा करून इतर ग्रामस्थांना मदतीसाठी बोलविले परंतु मदत कार्य दरम्यानच ग्रामस्थांना तिघांचे आढळून आले कामशेत परिसरात पिराजी हा अनेक महिन्यांपासून मजुराचे काम करत होता त्यामुळे त्याच्या मृत्यूमुखी पडल्याची घटना कळतातच त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मजुरांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती 

Vo2

संबंधित घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस पोलिस करत आहेत

सोमवार, १९ जुलै, २०२१

मा.दिपकभाऊ निकाळजे यांचे मावळ तालुकामध्ये कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्वागत ...

MAVAL TALKS NEWS .....

मा.दिपकभाऊ निकाळजे साहेब यांचे मावळ तालुकामध्ये शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले...




पुणे - ( मावळ तालुका ) : १८ जुलै

दिपकभाऊ निकाळजे सा.वि.संघटना संस्था.अध्यक्ष , तथा राष्ट्रीय अध्यक्ष RPI - आंबेडकर गट मा.दिपकभाऊ निकाळजे साहेब यांचे मावळ तालुकामध्ये शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले...




यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे साहेब, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष मा.बाळासाहेब पवार, मुंबई राज्य युवा अध्यक्ष मा.अक्षय निकळजे यांचे स्वागत संघनेचे महा.राज्य.संघटक मा.अमितभाऊ वर्मा , यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी  तालुक्याचे अध्यक्ष दत्ताशेठ यादव, चंद्रकांत ओव्हाळ , अंकुश चव्हाण , तेजसजी निकळजे, सम्राटभाऊ निकळजे, शशिकांतभाऊ चव्हाण, कविताताई पारखी, दिनेश शिंदे, पवन किरणजी गायकवाड़, पवन संजयजी गायकवाड़, कुमार ओव्हाळ, सचिन साळवे, अमोल ओव्हाळ , तसेच् दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मावळ तालुका , पुणे जिल्ह्यातील शेकडी पदाधिकारी उपस्थित होते...



बातम्या आणि जाहीराती साठी संपर्क

9028883534

शनिवार, १७ जुलै, २०२१

कलम 144 ची अंमलबजावणी मावळ तालुक्यामध्ये

MAVAL TALKS NEWS : मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवरती 144 कलम लागू




करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आज पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 


१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

२) पावसामुळे वेगाने वाहणान्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे,

३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

४) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दन्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी

काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे,

५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश

करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

६) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,

७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन करणे,

८) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे

साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.

९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे,

असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.



रविवार, ११ जुलै, २०२१

अश्व रिंगण देहु येथील मुख्य मंदीरात पार पडले

 

Maval Talks News...

विठू नामाच्या जयघोषात देहूनगरीत प्रातिनिधिक स्वरूपात  पार पडले अश्वाचे रिंगण.....



नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात अश्व धावता रिंगणी नाचे विठू काळजात...... अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना वारकरी भाविकांच्या मनात असते. शिण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगणांचा सोहळा. टाळ मृदूंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचां दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण देहु येथील मुख्य मंदीरात पार पडले खरंतर कोरोणाच्या संकटामुळे यंदा पालखी सोहळा देहूनगरी मध्येच मोजक्या भाविकांत सोबत पार पडत आहे त्यामुळे बेलवाडी इंदापूर येथे होणारा सोहळा यंदा देहूतील मुख्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.



काल मुख्य मंदिरात मेंढ्यांचे रिंगण पार पडल्यानंतर आज  टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात अश्वाचे रिंगण झाले यावेळी  विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृद्धांचे भान हरपले होते


बातम्या आणि जाहिरातिची संपर्क

9028883534




पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Maval Talks News : पवना धरणात पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू



पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू



 पव नानगर वार्ताहर (दि.१२) - पवना धरणात एक तरुण बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात हि घटना घडली. 

शुभम सुरेश दुधाळ(वय२१, रा.राजीव ग‍ांधी नगर खडकी पुणे) असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे.शुभम त्याचा भाऊ संकेत व सहा मित्र रविवारी सकाळी तुंग येथे फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारस पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पवनाधरणात पोहण्यासाठी उतरले असता पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने अनेक जण मदतीसाठी धावून गेले मात्र पोहता येत नसल्याने काहिच उपयोग झाला नाही. 

या घटणेची माहिती लोनावळा ग्रामीण पोलीसांना दिली असता लोनावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक युवक रोहित (छोट्या) जाधव, अक्षय उंबरकर, रमेश गोणते, तानाजी घारे यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले व दोन तासांनी बुडालेल्या तरूणाला बाहेर काढण्यात यश आले.युवक बुडाल्या नंतर घटनास्थळी लोनावळा ग्रामीण चे पोलीस तातडीने दाखल झाले मदत कार्य देखील सुरू झाले मात्र ज्या ठिकाणी युवक बुडाला ती हद्द वाघेश्वर गांवची असल्याने ती वडगांव पोलिसांची असल्याचे समजल्यानंतर येथे वडगांव पोलिसांना पंचनाम्यासाठी बोलवले गेले या नंतर एक तासाने वडगांव पोलीस येथे आले.


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क

9028883534

चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकांना लुटणारे जेरबंद

 चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकांना लुटणारे जेरबंद


Maval Talks News : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे.





कामशेत हद्दीत ( दि.१२ जुन ) रोजी ताजे पेट्रोल पंपावर मध्यरात्री १२.४८ वाजण्याच्या सुमारास दुर्गाप्रसाद जगत कहर (वय २७, रा.उत्तरप्रदेश) हे रस्त्याच्या बाजूला ट्रक मध्ये झोपलेले असताना चार अनोळखी इसमानी त्यांना मारहाण करून त्यांचे गाडीच्या कप्प्यामध्ये असणारी रक्कम सत्तर हजार रुपयांची रोकड जबदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.) मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जबरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर चे गुन्हे हे खालापूर येथील एक टोळी करीत असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाल्यानंतर खालापुर तालुक्यातील मोरबेवाडी चौक येथे सापळा लावत एलसीबी पथकाने गणेश हरिभाऊ वाघमारे (वय २८, रा. चौक मोरबेवाडी ता.खालापूर जि. रायगड) व संतोष उर्फ मंगल्या वाघमारे (वय २१ रा. चौक मोरबेवाडी ता. खालापूर) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी कामशेत हद्दीत दोन व तळेगाव दाभाडे हद्दीत तीन असे एकूण पाच गुन्हे केले

त्यांचे साथीदार संतोष उर्फ मलिक मारुती हिलम (रा. रामवाडी ता.खालापूर जि.रायगड), रोहिदास जाधव (रा. वरोसेवाडीत.खालापूर), राकेश वारे (रा. परळी ता.सुधागड जि.रायगड) यांच्या सोबत मिळून केले असल्याचे कबूल केले.हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) गणेश हरिभाऊ वाघमारे ( वय २८ रा.चौक मोरबेवाडी ता.खालापूर ) याच्यावर खालापूर पो.स्टे. गु. र. न. 149/2015 भादवि 307,324

२)  संतोष उर्फ मलिक मारुती हिलम ( वय २८, रा. विनगाव ता.खालापूर जि. रायगड )

याच्यावर खालापूर पो. स्टे. गु. र. न.  98/2017 भादवि 395, खोपोली पो. स्टे. गु. र. न.

169/2015 भादवि 394,34, लोणावळा शहर पो. स्टे. गु. र. न. 58/2005 भादवि 395,

खोपोली पो. स्टे. गु. र. न. 231/2019 भादवि

393,34 असे गुन्हे दाखल आहेत.

३) रोहिदास हरी जाधव ( वय २७ रा.वरोसेवाडी ता.खालापूर जि. रायगड याच्यावर कर्जत पो

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस

अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, सुनील जावळे, काशीनाथ राजापूरे, पोलीस हवालदार मुकुंद अय्याचित, सचिन गायकवाड, प्रकाश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क

9028883534

शनिवार, १० जुलै, २०२१

भुशी डॅम परिसर पर्यटकांनी तुडुंब भरले

 स्थळ: लोनावळा बुशी डॅम


कोरोना चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पर्यटन स्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असतानासुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे लोणावळा खंडाळा तसेच मावळ तालुक्यातील इतर पर्यटन स्थळावर पर्यटक बिनदिक्कतपणे दाखल होत आहेत पर्यटन नगरीत पर्यटकांना येण्यास मनाई नसून पर्यटन स्थळावर जाण्यास पर्यटकांना मनाई असल्याबाबत च्या सूचना पोलिसांकडून स्पष्टपणे पर्यटकांना देण्यात आले आहेत 




तरीदेखील सर्व नियम धाब्यावर बसवत तसेच पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जात पर्यटन स्थळ पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत त्यात कोठेच शासनाकडून देण्यात आलेल्या त्रिसूत्री चे पालन होतानाचा दिसून येत नाहीये त्यामुळेच कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात अधिक वाढत आहे

पर्यटन बंदीचा आदेश झुगारून लोणावल्यातील भुशी डयाम वर पर्यटकांनि मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती परंतु पोलिसांनी पर्यटकांवर कारवाही करत पर्यटकांना पुन्हा घरच्या दिशेने मार्गस्थ केलं आहे


पोलीस कर्मचारी बाईट

नितेश कवडे


मावळ प्रतिनिधी (सागर शिंदें)

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

नाणे मावळ भागातील रस्त्यांची डागडुजी

 नाणे मावळ भागातील रस्त्यांची त्वरित डागडुजी व खड्डे बुजवण्या संदर्भात मावळ  सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळ उपअभियंता व्हि.एस भुजबळ मॅडम व ए. एस. आडसुळे यांना 



मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष, संस्थापक युवा पर्व फाउंडेशन कैलासभाऊ गायकवाड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.




याप्रसंगी नाणे मावळ व आंदर मावळ मधील पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस विठ्ठलराव जाधव, कैलास खांडभोर, चंद्रशेखर परचंड, बाळासाहेब खंडागळे, बाळासाहेब प-हाड, अतुल चोपडे ,यमाजी बो-हाडे, नवनाथ गायकवाड ,तुकाराम बो-हाडे ,चिंधु बो-हाडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...



बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधा

9028883534

एक्सप्रेस वेवर झाला सात वाहनांचा अपघात

 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सात वाहनांचा  विचित्र अपघात दोघे जखमी








 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर कामशेत बोगद्यात महामार्गावर अज्ञात वाहनातून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाल्याने


सात वाहाने एकमेकांना धडकून विचीत्रअपघात झाला



यात एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे सायंकाळी 7 वाजण्यच्या सुमारास हा अपघात झाला त्यामुळे मुंबई लेनवर 4 ते 5 किलोमीटर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणा तसेच आय आर बी कर्मचारी यांच्या मदतीने महामार्ग वरील सांडलेले अंईल तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवल्याने तासाभराच्या प्रयत्नानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे


गुरुवार, ८ जुलै, २०२१

नैसर्गिक ऑक्सिजनसाठी तरुणांचा उपक्रम

मावळ : (सागर शिंदे) 

मावळचे निसर्गवैभव टिकवण्यासाठी झाडांची रोपे जमा करून झाडे लावणे किंतु नुसतेच झाड लावून सोडून न देता त्यांची काळजी घेऊन उरलेली रोपे काळजी घेणाऱ्या व्यक्तीस सोपवणे हा उपक्रम नाणे मावळातील तरुणांनी हाती घेतला आहे.


या उपक्रमांतर्गत कांबरे व कोंडीवडे परिसरातील डोंगर उतार, माळरान व कोंडेश्वर जांभवली येथे असणाऱ्या वनक्षेत्रातील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण व बीजरोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब, रिठा, कांचन, बहावा, चिंच, करंज, बांबू, पेरू, फणस, गुलमोहर ई. देशी जातीच्या झाडांचा समावेश होता. 


वृक्षारोपण व बीजरोपणासाठी प्रथमेश गायकवाड, मयूर जाधव, ऋतुराज गायकवाड, अभिषेक भांगरे, श्रीहरी कुटे, ओंकार भुंडे, नारायण गायकवाड, अनिकेत गायकवाड,किशोर गायकवाड, कार्तिक गायकवाड, अभिजित लोखंडे, प्रज्वल लोखंडे यांनी पुढाकार घेऊन हे अनमोल कार्य हाती घेतले. भविष्यात या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व बीजरोपण करण्याचा मानस आहे. 

ऑक्सिजन चे महत्व किती आहे याची जाणीव आपल्याला कोरोना म्हणजेच कोविड - १९ ह्या महामारीने करून दिली. ह्या भूतलावर टिकायचे असेल तर झाडे लावणे ही काळाची गरज आहे असे मत ह्या तरुणांनी ह्यावेळी व्यक्त केले.


आपल्या भागातील बातम्यांसाठी येथे संपर्क करा...


9028883534

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...