स्थळ: लोनावळा बुशी डॅम
कोरोना चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पर्यटन स्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असतानासुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे लोणावळा खंडाळा तसेच मावळ तालुक्यातील इतर पर्यटन स्थळावर पर्यटक बिनदिक्कतपणे दाखल होत आहेत पर्यटन नगरीत पर्यटकांना येण्यास मनाई नसून पर्यटन स्थळावर जाण्यास पर्यटकांना मनाई असल्याबाबत च्या सूचना पोलिसांकडून स्पष्टपणे पर्यटकांना देण्यात आले आहेत
तरीदेखील सर्व नियम धाब्यावर बसवत तसेच पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जात पर्यटन स्थळ पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत त्यात कोठेच शासनाकडून देण्यात आलेल्या त्रिसूत्री चे पालन होतानाचा दिसून येत नाहीये त्यामुळेच कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात अधिक वाढत आहे
पर्यटन बंदीचा आदेश झुगारून लोणावल्यातील भुशी डयाम वर पर्यटकांनि मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती परंतु पोलिसांनी पर्यटकांवर कारवाही करत पर्यटकांना पुन्हा घरच्या दिशेने मार्गस्थ केलं आहे
पोलीस कर्मचारी बाईट
नितेश कवडे
मावळ प्रतिनिधी (सागर शिंदें)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा