Maval Talks News : पवना धरणात पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
पव नानगर वार्ताहर (दि.१२) - पवना धरणात एक तरुण बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात हि घटना घडली.
शुभम सुरेश दुधाळ(वय२१, रा.राजीव गांधी नगर खडकी पुणे) असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे.शुभम त्याचा भाऊ संकेत व सहा मित्र रविवारी सकाळी तुंग येथे फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारस पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पवनाधरणात पोहण्यासाठी उतरले असता पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने अनेक जण मदतीसाठी धावून गेले मात्र पोहता येत नसल्याने काहिच उपयोग झाला नाही.
या घटणेची माहिती लोनावळा ग्रामीण पोलीसांना दिली असता लोनावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक युवक रोहित (छोट्या) जाधव, अक्षय उंबरकर, रमेश गोणते, तानाजी घारे यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले व दोन तासांनी बुडालेल्या तरूणाला बाहेर काढण्यात यश आले.युवक बुडाल्या नंतर घटनास्थळी लोनावळा ग्रामीण चे पोलीस तातडीने दाखल झाले मदत कार्य देखील सुरू झाले मात्र ज्या ठिकाणी युवक बुडाला ती हद्द वाघेश्वर गांवची असल्याने ती वडगांव पोलिसांची असल्याचे समजल्यानंतर येथे वडगांव पोलिसांना पंचनाम्यासाठी बोलवले गेले या नंतर एक तासाने वडगांव पोलीस येथे आले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
9028883534


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा