Maval Talks News...
विठू नामाच्या जयघोषात देहूनगरीत प्रातिनिधिक स्वरूपात पार पडले अश्वाचे रिंगण.....
नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात अश्व धावता रिंगणी नाचे विठू काळजात...... अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना वारकरी भाविकांच्या मनात असते. शिण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगणांचा सोहळा. टाळ मृदूंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचां दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण देहु येथील मुख्य मंदीरात पार पडले खरंतर कोरोणाच्या संकटामुळे यंदा पालखी सोहळा देहूनगरी मध्येच मोजक्या भाविकांत सोबत पार पडत आहे त्यामुळे बेलवाडी इंदापूर येथे होणारा सोहळा यंदा देहूतील मुख्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.
काल मुख्य मंदिरात मेंढ्यांचे रिंगण पार पडल्यानंतर आज टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात अश्वाचे रिंगण झाले यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृद्धांचे भान हरपले होते
बातम्या आणि जाहिरातिची संपर्क
9028883534


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा