MAVAL TALKS NEWS
अखिल भारतीय मानव अधिकार संघटने नियुक्ती प्रदान सोहळा
कामशेत : अखिल भारतीय मानव अधिकार संघटनच्या वतीने कुमार क्लब हस्ते कोथरूड येथे नवीन मदाधिकारी नेमणूक व सामाजिक कार्यकत्याचा सन्मान सोहळा दु.१२:३० वा आयोजित केला होता.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष शिवदास महाजन,कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड भूषण पाटील लीगल ऍड वायझर,सत्यशोधक रघुनाथ ढोक,फॉडेशनच्या अध्यक्षा निर्मला कुऱ्हाडे उपस्थित होते.
तर भूषण पाटील यांचे शुभहस्ते अखिल भारतीय मानव अधिकार संघटन महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निर्मला कुऱ्हाडे यांना नेमणुकीचे पत्र देण्यात आले.असून मावळ तालुका सचिव सचिन नंदू ठाकर,मावळ तालुका अध्यक्ष नारायण सुरेश वावरे,मावळ तालुका युवक अध्यक्ष पदी सुधीर दहिभाते यांची निवड करण्यात आली. असेच सामाजिक कार्या बद्दल सत्यशोधक रघुनाथ ढोक,मुबिना शेख,नागनाथ लष्करी,चंद्रकांत हलगरे,मेहमूदा गोऱ्हे,पत्रकार सुभाष भोते यांचा विशेष सन्मान पत्र अध्यक्ष शिवदास महाजन याचे हस्ते देण्यात आले.या प्रसंगी शिवदास महाजन म्हणाले की आपली संस्था फक्त भारत देशात काम करीत नसून या संस्थेचे कार्य इंग्लंड,पाकिस्तान, जर्मनी,अशा देशात कार्यकरीत आहे.अनेकांना न्याय मिळवून देण्यात कार्य सातत्याने करीत असल्याचे म्हटले.
या कार्यक्रमाचे संयोजक निर्मला कुऱ्हाडे यांचा केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला असून रघुनाथ ढोक यांच्या तर्फे महात्मा फुले चरित्र व थोर ऐतिहासिक थुर महिला पुस्तकांचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रघुनाथ ढोक तर आभार प्रदर्शन नारायण वावरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा